तू दिसताच मला
तू दिसताच मला भान मी हरपलो
तू दिसताच मला तहान भूक विसरलो,
अस वाटल कि आपल कोणी भेटलं
पटकन उडी मारून ते हृदयात जाऊन बसल...
तू दिसताच मला
मी स्वताला विसरलो
तुझ्या डोळ्यात स्वतःलाच हरवून बसलो,
तू तीच जिला मी शोधात होतो
तुझ्यासाठीच वणवण भटकत होतो
ते गुलाबी तुझे गाल, मदमस्त यौवनाची चाल
केलेस मला तू घायाळ..
तू दिसताच मला
तुला मनातले सांगायचे ठरवले
मन मोकळे करायचे ठरवले
पण कधी मैत्रिणींच्या घोळक्यात तर कधी
नातेवाईकांच्या गर्दीत संधीच मिळाली नाही
स्वप्न बघितले पूर्ण झाले नाही..
तू दिसताच मला
ज्या गोष्टी मी ठरवल्या होत्या,त्या आजही तशाच कायम आहेत
आज तू नाही तरी तुझ्या आठवणी आहेत... तुझ्या आठवणी आहेत...