एकच गोष्ट करायची चुकलो मी
सगळच कस अर्धवट राहून गेलं
की तुझ्या माझ्या नात्याला नावच द्यायाच राहून गेलं ..

साधं सरल चालणारा मी ..तुझ्या संगतीला लागलो
आयुष्य माझ बदलून टाकलास ...तुझ्या प्रेमात मी पडू लागलो ..
पहिलं वहिल होतं ते ...आधी तर समजलच नाही..
भरकटत गेलो तुझ्या मागे ......वेळ गेलेला कलालच नाही ...

तुझ्या त्या प्रेमळ सहवासात ....सकाळची संध्याकाल होऊ लागली ..
रात्रीच्या झोपेची जागा ...आठवन तुझी घेऊ लागली ...
कधी चुकून डोळे मिटलेच ..तर स्वप्नात तू दिसू लागली
सकाळ माझी तुझ्यामुले ...सातव्या आभालावर होऊ लागली

कसे गोड़ दिवस होते ते ....
चांदन्यात जगण्याचे ..
पावसात भिजन्याचे ....
वाऱ्यावर झेपावन्याचे .....
डोळ्यांनीच बोलण्याचे .....
उगाच हसायचे ...
प्रेमात वेड़े व्हायचे ....

काहीशी वेगळीच होतीस तू...
मला माझी जाणीव करून देणारी होतीस तू......
माझ्या आयुष्याला अर्थ देणारी होतीस तू..
माझी आणि फ़क्त माझी होतीस तू...

पण मी कुठल्यातरी गैरसमजुतित जगत होतो ..
त्याचाच पुरावा आज मी पाहत होतो ...
पत्रिका होती तुझ्या लग्नाची ....
चंदेरी सोनेरी ...सुन्दर सजवलेल्या मण्यांची .....

त्या पत्रिकेने जग माझं चोरून नेलं ..
माझ्या स्वप्नांवरती दू:ख नाचून गेलं ...
का तुझ्या माझ्या नात्याला नावच द्यायाच राहून गेलं ..