अस वाटते कुणी तरी असाव ,
माझ्या वर खूप प्रेम करणार ,
माझ्या सोबत जीवन जगणार ,
माझ्या हसण्यात आनंद बघणार ...

अस वाटते कुणी तरी असाव ,
हक्कानी गोष्टी सांगणार ,
छोट्या छोट्या गोष्टीत रुसणार ,
माझ्या अश्रूंची परिभाषा समजणार ...

अस वाटते कुणी तरी असाव ,
गर्दीतूनही मला ओळखणार ,
कोण्याही परीस्थित हात न सोडणार ,
स्वताचे स्वप्न माझ्यात बघणार ...

अस वाटते कुणी तरी असाव ,
माझ्या मिठीत सर्व दुख विसरणार ,
मला बघतच सगळे tension विसरणार ,
माझ्या जिवनाच अर्थ बनणार ...

अस वाटते कुणी तरी असाव ,
माझी आतुरतेन वाट बघणार ,
आणि त्या वाटेत हि आनद भोगणार ,
मी येताच पळत माझ्या मिठीत येणार ...

अस वाटते कुणी तरी असाव ,
माझ्या कवितेचा शब्द बनणार ,
त्या कवितेचा अर्थ समजणार ,
आणि त्या कवितेने भारावून जाणार ...

अस वाटते अस असेल कुणीतरी , कुठेतरी ,
असच माझ्या सारखा विचार करणारी ...