प्रेम की मैत्री??
मित्रांनो जर कोणाला याच उत्तर माहिती असेल तर मला जरा सांगाल का??


हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
कशाला म्हणतात प्रेम ??


कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत ??
दिवसरात्र तिचा विचार करण हे प्रेम असत ??
येणार नाही माहित असुनही तिच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत ??
की ती नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत ??


ऑरकुट वर सारख तिच्या प्रोफाइल ला विझिट करणं...
तिचा नंबर डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करणं याला प्रेम म्हणतात ??
मी बोलणारच नाही तिच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...पण atleast एक मिस कॉल ची अपेक्षा करणं याला प्रेम म्हणतात
की तिला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही
तिच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात ??


तिच्या एका नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात ??
तिच्या मिठीसाठी आतुरण याला प्रेम म्हणतात ??
तिच्यासाठी वाटनारया काळजिला प्रेम म्हणतात ??
की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात ??


तिच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही
तिच्या बरोबर स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात ??
स्वतःच्याही नकळत तिच्यात गुंतत जाण याला प्रेम म्हणतात ??


७ जन्माची सोबत देण्याचे प्रोमिस करून ७ महिन्यात सोडून जान ह्याला प्रेम म्हणतात??
की तिच्या सर्व चूका विसरून तिला माफ़ करणं ह्याला प्रेम म्हणतात??


कुणीतरी सांगाल का मला ??
हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???


प्रेम करण खुप सोप आहे...काय लागत प्रेम करायला?? एकदा आय लव्ह यू बोललं की झाल??
मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही हे प्रोमिस करायला किती सोप्प आहे...पण जेंव्हा ते खर करून दाखवायची वेळ येते तेंव्हा मग अचानक विसर पडतो त्या सर्व प्रोमिस चा...
प्रोमिस देण्यासाठी काय लागत हो ??? काही दिवसांनी तर हा पण विसर पडायला लागतो की कधी तरी कोणाला तरी काहि तरी प्रोमिस केल होत...


मला आज पर्यंत हे समजलच नाही की जुनी नाती तुटली म्हणुन काही नवीन नाती जोडायची आणि पुन्हा जुने लोक भेटले की नवीन नाती तोडायची...


या जोड़ा जोड़ी आणी तोडा तोडीच्या खेळामधे कोणाचा तरी जिव जात असतो याच कोणाला काहीच घेण देण रहिलेल नसत.....
                                                                              
-Tush-R