हवेची एक मंद झूळूक हळूच मला स्पर्श करून जाते !!
कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात घेऊन जाते
जेथे मी एकटीच तुझी वाट पाहत असते !!
तेथे असतो फ़क्त तुझा आभास
ज्यामुळे मी स्वत:लाच विसरते !!
तुझ्या एकाच प्रेमस्पर्शाने
हृदय बेधुंद होउन जाते !!
आणि मन मोहरत असताना
तन शरारून जाते !!
कधी अचानकच लाजते
कधी कारण नसताना हसते !!
कधी कधी निरागस वृत्तीने
एकटीच शांत बसून राहते !!
तेव्हा माझी नजर फ़क्त तुला
आणि तुलाच शोधत असते !!
तेव्हाच कुणीतरी, "अगं, अशी गप्प
का बसलीस? " असे विचारते !!
डोकं भानावर आले तरी
मन त्याच गुन्तागुन्तीत अडकलेले असते !!
तुझी एकच नजर माझ्यावर
करणी करून जाते !!
कधी कधी असे वाटते ,
मी तुझा एवढा विचार का बरं करते? !!
माझे मन हळूच मला सांगते,
"अगं हे वयच तसे असते" !!
तुला असे शब्दांत वर्णन करणे
मला खुप कठिन जाते !!
पण अनावर झालेल्या तुझ्या आठवणींनी
माझे कलम लिहितच रहते !!
आजकाल मी आरशात बघून तयार होते
'तुला आज काय आवडेल' याचा विचार करून सजते !!
शरीराच्या प्रत्येक बाजूने स्वत:ला न्ह्याहाळते
आणि अचानकच कुणीतरी "पुरे आता" म्हणून बाजूला सारते !!
आणि मग माझे भरकटलेले मन भानावर येते
पण दृष्टी मात्र हरवून जाते,
गर्दीतही तुझाच शोध घेत असते !!
कुठलेही कम करताना
तू माझ्याबरोबर आहेस असे वाटते !!
असच स्वस्थ, शांत बसून
पुन्हा तुझ्यात मग्न व्हावेसे वाटते !!
असताच अचानक फोन वाजतो
आणि माझी विचारशृंखला टूटते !!
मग मी ह्या सर्वान्तुन
पूर्णपणे बाहेर पड़ते !!
तेव्हा मला हे सर्व काल्पनिक ,
भावनिक आणि खुळ्यासारखे वाटते !!
आणि मग "काय विद्या, हे कसले
विचार करतेस?" असे खुद्द माझे मनच मला विचारते !!
कधी कधी मी स्वत:च पछतावते
स्वत:लाच वेड्यात काढ़ते !!
या एकविसाव्या शतकात,स्पर्धेच्या युगात
या गोष्टीसाठी जागाच नसते !!
असे समझल्यावर मी निराश होते
आणि कुठल्यातरी दू:खाच्या ओघात वाहून जाते !!
अचानक होणा-या या आघाताने मन तीळ तीळ टूटते
सर्वांपासून दुरावते, कोमेजते !!
ते सर्व विसरण्यासाठी मी हळूच
तय खुल्या खिडकीकडे बघते !!
तेथून एक झुळूक आत येते
आणि हळूहळू माझ्या श्वासात भिनु लागते !!
ती पुन्हा मला स्वत:बरोबर खेचून नेते
मी सुद्धा एखाद्या सुकलेल्या पानासारखी उडत जाते !!
पुन्हा त्याच अनोळख्या तुझ्या विश्वात
हे प्रेम आहे की वयातील बदल
हा फ़क्त एक विचार आहे की
जीवनाचे सत्य !!!
- GanuVidya
प्रेम म्हणजे काय ?
खरोखर ... प्रेम म्हणजे काय ?
तुझे माझे अचानक भेटणे
की एकमेकांच्या नजरेत हरवून जाणे..
माझे हळूवार लाजणे
की तुझे गडबडून जाणे..
माझे शांत गाणे,
की तुझे शब्द जोडणे..
माझे छान दिसणे,
की तुझे आकर्षक असणे..
माझे चंचल मन,
की तुझे संथ हृदय..
माझे हलकेच हसणे,
की तुझे माझ्यात गुंतणे..
तुझे स्पर्श करणे,
की माझे मोहरून जाणे..
दूर असताना मला तुझी आठवण येणे,
की माझे नेहमीच तुझ्या सोबत असणे..
तुझे मला चिडवणे,
की माझे उगाच रागवणे..
तू दुसरीला बघितल्यावर माझे जळणे,
की माझे दुस-याशी बोलणेही तुला सहन न होणे..
भेटल्यावर तुला वेळेचे भान नसणे,
की मला लवकर घरी जाण्याची ओढ लागणे..
भांडण झाल्यावर माझे उदास होणे,
की तुझे सतत बेचैन असणे..
आपण कधी मित्रमैत्रिण असणे,
की कधी त्याहून जास्त काहीतरी वाटणे..
हे खरोखर प्रेम आहे ,
की मैत्री ,
की फक्त आकर्षण !!!!!
- GanuVidya
खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.
खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.
खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..!!
प्रेम की मैत्री??
मित्रांनो जर कोणाला याच उत्तर माहिती असेल तर मला जरा सांगाल का??
हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
कुणी तरी सांगाल का हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
कशाला म्हणतात प्रेम ??
कोणाचीतरी सतत आठवण येण हे प्रेम असत ??
दिवसरात्र तिचा विचार करण हे प्रेम असत ??
येणार नाही माहित असुनही तिच्या फ़ोनची वाट पाहन हे प्रेम असत ??
की ती नाही म्हणुन गर्दीतही एकाकी वाटन हे प्रेम असत ??
ऑरकुट वर सारख तिच्या प्रोफाइल ला विझिट करणं...
तिचा नंबर डायल करून रिंग वाजन्याआधी फोन कट करणं याला प्रेम म्हणतात ??
मी बोलणारच नाही तिच्याशी ठरवूनही ...
फ़ोन नाही तर नाही...पण atleast एक मिस कॉल ची अपेक्षा करणं याला प्रेम म्हणतात
की तिला गरज नाही तर मी तरी का भाव देऊ अस म्हणुनही
तिच्या एका सॉरी ने क्षणात विरघलुन जाण याला प्रेम म्हणतात ??
तिच्या एका नजरेसाठी व्याकुळ होण याला प्रेम म्हणतात ??
तिच्या मिठीसाठी आतुरण याला प्रेम म्हणतात ??
तिच्यासाठी वाटनारया काळजिला प्रेम म्हणतात ??
की त्या ख़ास मैत्रीला प्रेम म्हणतात ??
तिच्या जगात आपल स्थान नाही माहित असुनही
तिच्या बरोबर स्वप्न रंगवन याला प्रेम म्हणतात ??
स्वतःच्याही नकळत तिच्यात गुंतत जाण याला प्रेम म्हणतात ??
७ जन्माची सोबत देण्याचे प्रोमिस करून ७ महिन्यात सोडून जान ह्याला प्रेम म्हणतात??
की तिच्या सर्व चूका विसरून तिला माफ़ करणं ह्याला प्रेम म्हणतात??
कुणीतरी सांगाल का मला ??
हे प्रेम म्हणजे नक्की काय असत ???
प्रेम करण खुप सोप आहे...काय लागत प्रेम करायला?? एकदा आय लव्ह यू बोललं की झाल??
मी तुला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही हे प्रोमिस करायला किती सोप्प आहे...पण जेंव्हा ते खर करून दाखवायची वेळ येते तेंव्हा मग अचानक विसर पडतो त्या सर्व प्रोमिस चा...
प्रोमिस देण्यासाठी काय लागत हो ??? काही दिवसांनी तर हा पण विसर पडायला लागतो की कधी तरी कोणाला तरी काहि तरी प्रोमिस केल होत...
मला आज पर्यंत हे समजलच नाही की जुनी नाती तुटली म्हणुन काही नवीन नाती जोडायची आणि पुन्हा जुने लोक भेटले की नवीन नाती तोडायची...
या जोड़ा जोड़ी आणी तोडा तोडीच्या खेळामधे कोणाचा तरी जिव जात असतो याच कोणाला काहीच घेण देण रहिलेल नसत.....