तुझ्या नजरेत जादू आहे की तुझ्या बोलण्यात

जणू कशाने मी बेभान झाले तुझ्या प्रेमात ! 

कधी काळेल का तुला या वेडीची माया

तुझ्या स्वप्नांतच जणू हरवली ही काया ! 

ओढ़ लागली तुझीच आता या जीवाला

येशील का धावत माझ्या एका हाकेला ? 

जणू विसरले हे जग तुझ्यातच मी

अन कधी हरवून बसले सर्वकाही मी ! 

सद्ध्या हा जीव तुझ्या आठावणीतच रमतो

दिवसरात्र फ़क्त तुझाच जप करतो ! 

तुझ्याविना सर्व सुख व्यर्थ वाटते

तुझ्यासवे मृत्युही जगणे भासते ! 

अखंड प्रेम आहे माझे तुझ्यावर

पण तुझेही आहे का तेवढेच माझ्यावर ? 

माझ्या नाजुक मनाला

कधी तोडणार नाहीस ना ?

विश्वास आहे तुझ्यावर

कधी मोडणार नाहीस ना ? 

मी तर सांगेन सर्व जगाला की

तुझ्यावरच आहे माझे प्रेम

पण माहित नाही कधी

कळेल का तुला........माझे प्रेम ?
                                                                 - GanuVidya