प्रेम करावं पॄथ्विसारखं
सुर्याभोवतीच घुट्मळत राहणारं
ग्रहणे जरी लागली सुर्याला
तरी त्यांनाही माफ़ करणारं

प्रेम करावं पानांसारखं
फ़ांदीवरच खिदळत राहणारं
झाली जरी पड्झड तरी
पुन्हा फ़ांदीवरच येणारं

प्रेम करावं माशासारखं
पाण्याशीच एकरुप होणारं
झाला जर विरह तर
जीवनालाच झोकुन देणारं

प्रेम करावं मुळांसारखं
मातीलाच धरुन राहणारं
अनेक वादळं आली तरी
तिच्यातलं सत्वच शोधणारं

अरे....प्रेम करावं माझ्यासारखं
तिच्यासाठीच कविता लिहिणारं
तिने वाचल्या नाहीत तरी
शाई फ़ुकट घालवणारं .....