मन जड झाले
भांबावुन गेले
विरहात माझे
रंग हरवले
सप्तरंगी तेव्हा
स्मरणांच्या भेटी
रंगवुनी देती तुझे डोळे..
सुगंधात न्हाते
मोहरून येते
पाहताना माझे
भान हरपते
पापणीच्या आड
प्रेम साठवती
सखे माझ्यासाठी तुझे डोळे..
स्वप्न जगण्याचे
उंच उडण्याचे
तुझ्यामुळे सारे
क्षण स्वर्ग माझे
आशेची किनार
समृद्धिची ओटी
चैतन्याच्या ज्योती तुझे डोळे..
तुझे डोळे..
-Tush-R
0 comments:
Post a Comment