वाटलं नव्ह्त हृदय तुटलं तर
इतकं दु:ख सोसावं लागेल
आज पर्यंत श्वासांनी मला.
पण यापुढे त्यांना पोसावं लागेल.
तुज्या आठवणींच्या साखर झोपेत
माझी कालची रात्र गोडव्यात सरली.
पूर्वी स्वप्नांच्या जत्रेत मन जायचं,
पण काल स्वप्नांनीच मनात जत्रा भरली.
'प्रेम'.....शब्द दोन अक्षरांचा,
नुसता ऐकला तरी हर्ष होतो.
आणि उच्चारला तर
दोन ओठांमधे स्पर्श होतो.
तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू,
मला समुद्राहून खोल वाटला.
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला.
माझं दु:ख बघवलं नाही,
म्हणून एक ढग रडत होता.
तुमचं आपलं काहीतरीचं
म्हणे तेव्हा पाउस पडत होता.....
0 comments:
Post a Comment