जेव्हा कधीतरी मी खिडकीत बसते 
हवेची एक मंद झूळूक हळूच मला स्पर्श करून जाते !! 
अन ती झूळूक मला नकळतपणेच 
कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात घेऊन जाते
जेथे मी एकटीच तुझी वाट पाहत असते !!

तेथे असतो फ़क्त तुझा आभास
ज्यामुळे मी स्वत:लाच विसरते !!

तुझ्या एकाच प्रेमस्पर्शाने
हृदय बेधुंद होउन जाते !!
आणि मन मोहरत असताना
तन शरारून जाते !! 


कधी अचानकच लाजते
कधी कारण नसताना हसते !!
कधी कधी निरागस वृत्तीने
एकटीच शांत बसून राहते !!

तेव्हा माझी नजर फ़क्त तुला
आणि तुलाच शोधत असते !!
तेव्हाच कुणीतरी, "अगं, अशी गप्प
का बसलीस? " असे विचारते !!

डोकं भानावर आले तरी
मन त्याच गुन्तागुन्तीत अडकलेले असते !!
तुझी एकच नजर माझ्यावर
करणी करून जाते !!

कधी कधी असे वाटते ,
मी तुझा एवढा विचार का बरं करते? !!
माझे मन हळूच मला सांगते,
"अगं हे वयच तसे असते" !!

तुला असे शब्दांत वर्णन करणे
मला खुप कठिन जाते !!
पण अनावर झालेल्या तुझ्या आठवणींनी
माझे कलम लिहितच रहते !!

आजकाल मी आरशात बघून तयार होते
'तुला आज काय आवडेल' याचा विचार करून सजते !!
शरीराच्या प्रत्येक बाजूने स्वत:ला न्ह्याहाळते
आणि अचानकच कुणीतरी "पुरे आता" म्हणून बाजूला सारते !!

आणि मग माझे भरकटलेले मन भानावर येते
पण दृष्टी मात्र हरवून जाते,
गर्दीतही तुझाच शोध घेत असते !!

कुठलेही कम करताना
तू माझ्याबरोबर आहेस असे वाटते !!
असच स्वस्थ, शांत बसून
पुन्हा तुझ्यात मग्न व्हावेसे वाटते !!

असताच अचानक फोन वाजतो
आणि माझी विचारशृंखला टूटते !!
मग मी ह्या सर्वान्तुन
पूर्णपणे बाहेर पड़ते !!

तेव्हा मला हे सर्व काल्पनिक ,
भावनिक आणि खुळ्यासारखे वाटते !!
आणि मग "काय विद्या, हे कसले
विचार करतेस?" असे खुद्द माझे मनच मला विचारते !!

कधी कधी मी स्वत:च पछतावते
स्वत:लाच वेड्यात काढ़ते !!
या एकविसाव्या शतकात,स्पर्धेच्या युगात
या गोष्टीसाठी जागाच नसते !!

असे समझल्यावर मी निराश होते
आणि कुठल्यातरी दू:खाच्या ओघात वाहून जाते !!
अचानक होणा-या या आघाताने मन तीळ तीळ टूटते
सर्वांपासून दुरावते, कोमेजते !!

ते सर्व विसरण्यासाठी मी हळूच
तय खुल्या खिडकीकडे बघते !!
तेथून एक झुळूक आत येते
आणि हळूहळू माझ्या श्वासात भिनु लागते !!

ती पुन्हा मला स्वत:बरोबर खेचून नेते
मी सुद्धा एखाद्या सुकलेल्या पानासारखी उडत जाते !!
पुन्हा त्याच अनोळख्या तुझ्या विश्वात
हे प्रेम आहे की वयातील बदल
हा फ़क्त एक विचार आहे की
जीवनाचे सत्य !!!
                                                                GanuVidya